नाविण्यपुर्ण व पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना / प्रयोग / उपक्रम नाविण्यपुर्ण योजना :- धुळे जिल्ह्यात ग्रामिण भागातील दिव्यांगांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे

परिशिष्ट
अ
पारितोषिकांसाठी
कार्यक्षेत्र
1) नाविण्यपुर्ण
व
पथदर्शी
स्वरूपाच्या
संकल्पना
/
प्रयोग
/
उपक्रम
नाविण्यपुर्ण
योजना
:-
धुळे
जिल्ह्यात
ग्रामिण
भागातील
दिव्यांगांचे
घरोघरी
जाऊन
सर्वेक्षण
करणे.
1.1
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचे एकुण 21 प्रकार आहेत. या 21 प्रकारातील दिव्यांगांना विविध कल्याणकारी योजना राबवुन त्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी आराखडा करणे आवश्यक ठरते. जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींचा निश्चित आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे निश्चित दिव्यांगांचे आकडेवारी उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती विचारात घेऊन व महात्मा गांधी सेवा संघ, छत्रपती संभाजी नगर यांनी राज्यात प्रथमत: अकोला जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगांचा घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. सदर सर्वेक्षणाच्या अकोला जिल्ह्याच्या कार्यक्रमास मा. राष्ट्रपती भारत सरकार यांचेकडुन सन्मानित करण्यात आले.
अकोला जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर बरीच रक्कम खर्च करण्यात आलेली होती. मात्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे व मा. जिल्हाधिकारी, धुळे यांच्या कल्पकतेने प्रकल्प संचालक, महात्मा गांधी सेवा संघ, छत्रपती संभाजी नगर यांचेशी प्रत्यक्ष वाटाघाटी करून सदरचे सर्वेक्षण 9,90,000/- या अत्यंल्प रक्कमेवर दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्याची वाटाघाटी पुर्ण केली.
संपुर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांचे सर्वेक्षणाचे शासनामार्फत आदेश करून सर्वेक्षणाचे कामकाज सुरू केलेले आहे. मात्र धुळे जिल्ह्यात कमी रकमेवर ग्रामिण भागातील दिव्यांगांचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आलेले आहे. सर्वेक्षणाच्या मिळालेल्या तपशिलानुसार जिल्ह्यात आशाताई मार्फत 304963 घरांमध्ये जाऊन एकुण 37257 दिव्यांग व्यक्तींची नोंद केली आहे. दिव्यांगांची नोंदीची टक्केवारी सरासरी 3.25 एवढी आहे.
दिव्यांगांचा सदरचा सर्वेक्षणामध्ये एकुण 74 मुद्दयांवर सर्वेक्षण करण्यात आलेले असुन या सर्वेक्षणात दिव्यांग व्यक्तींची गावनिहाय, लिंगनिहाय, वयनिहाय, शिक्षणनिहाय, तालुकानिहाय इ. विविध विषयांवर भर देऊन माहिती संकलित केलेली आहे. सदरची संकलित केलेली माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.
1.2
धुळे जिल्ह्यात ग्रामिण भागातील दिव्यांगाचे सर्वेक्षण हा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. जिल्हाधिकारी, धुळे यांच्या वैशिष्टपुर्ण वाटाघाटीनुसार महात्मा गांधी सेवा संघ छत्रपती संभाजीनगर या स्वयंसेवी संस्थेकडुन अत्यंल्प निधीवर सर्वेक्षण केलेले आहे. सदर केलेले सर्वेक्षण हे इतर जिल्ह्यांसाठी निश्चित पथदर्शी आहे.
1.3
धुळे जिल्ह्यात ग्रामिण भागातील या नाविण्यपुर्ण उपक्रमामुळे दिव्यांग नागरिकांची / लाभार्थ्यांची यादी उपलब्ध झालेली आहे. या उपलब्ध झालेल्या यादीनुसार जिल्हा प्रशासनामार्फत बृहत आराखडा तयार करण्याचे कामकाज हाती घेतलेले असुन बृहत आराखड्यानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनेमार्फत लाभांकीत करण्याचे कार्य जिल्हा प्रशासनामार्फत हाती घेण्यात येत आहे.
1.4
धुळे जिल्ह्यात ग्रामिण भागातील दिव्यांगांचे सर्वेक्षण ही नाविण्यपुर्ण योजना जिल्हा परिषदेने राबविली असुन नागरी भागातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करणेबाबत आयुक्त, महानगरपालिका, धुळे प्रशासन अधिकारी, नगरविकास विभाग, धुळे यांचेमार्फत राबविणेबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे

Comments 0 Like 0 Dislike 0